साजई हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १४८९ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साजई व जिल्हा परिषद प्राथमिक मडके पाडा अशी २ शाळा , अंगणवाडी केंद्रे २(साजई, मडके पाडा ), व व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ग्रामदेव मंदिर व जुने हनुमंताचे मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर भात ही प्रमुख पिके घेतली जातात. साजई ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत.